कळंब (प्रतिनिधी) - स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने नवीन वर्षाच्या निमित्ताने कळंब मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

मागील सात वर्षापासून स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडीच्यावतीने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. नववर्षाची सुरुवात आरोग्यदायी व्हावी, सामजिक ऐक्य बळकट व्हावे व नव्या जुन्या पिढीतील शरीर संपदेच्या दृष्टीने व्यायामची जोपासना व्हावी. या सदउद्देशाने या स्पर्धेचे आयोजन दि. 1 जानेवारी 2024 रोजी नगर परिषद शाळा क्र.1 पासून सकाळी सहा वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. डिकसळ येथील केंम्ब्रिज इंग्लिश स्कूलपर्यंत कळंबकर सोबतच राज्य भरातील स्पर्धक या स्पर्धेत धावणार आहेत. यामध्ये वयोमर्यादेनुसार पाच गटात ही मॅरेथॉन पार पडणार आहे. वय वर्ष 6  ते 15 मुली, 6 ते 15 मुले, खुला गट महिला व पुरुष, वय वर्ष 45 पुढील असे 5 गटामध्ये स्पर्धा होणार आहेत. या पाचही गटातील विजयी स्पर्धकांना भरघोस बक्षिसे आणि सन्मानचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.


कळंब शहरातील नगर परिषद मैदान येथून मॅरेथॉन सुरू होणार असून, अहिल्याबाई होळकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ढोकी नाका मार्गे ढोकी रोडवरील डिकसळ येथील केंब्रिज इंग्लिश स्कूलपर्यंत तब्बल अडीच किमी अंतर पार करून ही मॅरेथॉन संपन्न होणार आहे.


गेल्या 4 दिवसापासून नाव नोंदणीला सुरवात झाली आहे या चार दिवसात प्रचंड उत्स्फूर्तपणे सोलापूर, मुरुम, धाराशिव व लातूर येथून नाव नोंदणी होत आहेत.

बाळासाहेब कथले(कथले आघाडी कळंब)


 
Top