परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव अंतर्गत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे दि. 27 डिसेंबर 2023 रोजी बौद्धिक संपदा अधिकार या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून विजय शिवपूजे लातूर हे उपस्थित होते. 

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने, कार्यशाळेचे आयोजक डॉ. अतुल हुंबे, मराठी विभाग प्रमुख डॉ. हरिश्चंद्र गायकवाड उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये विजय शिवपुजे यांनी विविध प्रकारचे बौद्धिक संपदा अधिकार त्यांचा वापर आणि फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. कॉपीराईट पेटंट भौगोलिक संपदा अधिकार जी आय व्यापारचिन्ह ट्रेडमार्क आणि औद्योगिक रचना अधिकार इंडस्ट्रियल डिझाईन आणि त्यामधील फरक याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. विविध प्रकारच्या संशोधनाचे पेटंट कसे प्राप्त करावे याबद्दलही सविस्तर माहिती दिली.

पेटंट ऑफिस भारत सरकार असो चॅम्प नवी दिल्ली आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एम. एस. एम. ई मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ महेश कुमार माने यांनी केले .डॉ विद्याधर नलवडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर डॉ सचिन चव्हाण यांनी आभार मानले.


 
Top