तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने 2019 साली ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी ‌‘जलजीवन' मिशन सुरू केले आहे. माञ तुळजापूर तालुक्यातील बहुतांशी गावात जलजीवन कामे अतिशय संथ गतीने होत असल्याने यंदा ग्रामस्थांना पाणीटंचाई ला सामोरे जावे लागत. त्यामुळे शाषणाने पाणीपुरवठासाठी कोट्यावधी रुपये खर्चुन केवळ ठेकेदार अभियंता यांच्या वेळखाऊ दुर्लक्षितपणामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. 

तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा काक्रंबा ही संयुक्त योजना राबवली तसेच काटगाव येथे ही राबवले जात आहे. माञ सदरील  अपुर्ण असुन नळयोजने साठी खोदलेल्या रस्त्यामुळे ञास सहन करावा लागत आहे. या योजनेतंर्गत रामदरा तलाव ते आपसिंगा व काक्रंबा या गावांना रामदरा तलावातुन जोडणारी पाईप लाईन प्राधान्यानेगरजेचे असताना  ते न करता गावात खोदकाम सुरु केले आहे. टाकी काम नाहीकारणजागा निश्चीत नाही  फिल्टर काम नाही माञ गावात खोदकाम करुन फक्त पैसे उचलणे हेतुने ठेकेदार वागत याला अधिकारी वर्गाची साथ असल्याचे दिसुन येत आहे. पिचकलेले पाईप कट न करता व्यवस्थित जोडणि न वापरत आहेत. यामुळे भाविष्य लवकरच फेल जाण्याची शक्यता आहे. रामदरा तलावात विहरी केलेली अंदाजपञकानुसार केली कि नाही याची तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांन मधुन केली जात आपसिंगा येथे अंतर्गत लाईन टाकताना टाकी ते गाव लाईन टाकणे काम सुरु असुन किती खोलीवर पाईप लाईन टाकली याची चौकशी ची मागणी होत आहे. अधिकारी वर्गाच्या अर्थपुर्ण दुर्लक्षमुळे स्टेप स्टेप काम न करता आधी दिखावु काम करुन पैसे काढणेसाठी ठेकेदाराची धडपड चालु असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला गावात ब्रेक लागल्याने 'हर घर जल' मिळणे कठीण होणार आहे. सदरील काम दर्जदार होण्यासाठी आपसिगा गावचा ग्रामसभेत ग्रामस्थांनी एमजीपी चा व ठेकेदार प्रतिनिधी यांना स्टेप बाय स्टेप कामे करा दिखावु कामे करु नका अंदाजपत्रक नुसार करा यासाठी धारेवर धरले सदरील  ठेकेदार प्रतिनिधी गाव पुढाऱ्यांन मध्ये  लावालावी करुन आपली पोळी बाजुन घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा करीत ग्रामस्थांनी  या ग्रामसभेत  हल्लाबोल केला.


 
Top