भूम (प्रतिनिधी)-तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुक्यातील गोळेगाव येथील नवबौद्ध मुलांची निवासी शाळा येथे पार पडले. राज्य विज्ञान संस्था नागपूर व शिक्षण विभाग धाराशिव यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी कार्यालय मार्फत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा होता. 

सामाजिक निवड लक्षात घेऊन मुख्य विषयांना अनुसरून विविध उपविषय देण्यात आले होते. पंचायत समिती भूमचे गट विकास अधिकारी सुरेश गायकवाड यांनी उद्घाटन केले. तसेच गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांनी आपल्या मनोवतामध्ये विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये प्राथमिक गटातून 48 तर माध्यमिक गटातून 24 शाळांनी सहभाग नोंदविला. प्राथमिक विभागातून आर्यन विकास जाधव जि .प .शाळा भूम प्रथम, पार्थ तात्यासाहेब हूबे रवींद्र हायस्कूल भूम द्वितीय, नंदनी भाऊसाहेब पाटील जि. प. प्रशाला अंधारे वस्ती माणकेश्वर तृतीय, तर माध्यमिक विभागातून सोनल श्रीमंत मुंडे अंतरगाव हायस्कूल प्रथम, ठोंबरे शरयू गणेश रवींद्र हायस्कूल, शशिकांत शिंदे छत्रपती शिवाजी विद्यालय सुकटा यांना पारितोषिक मिळाले. तसेच जि. प. प्रा. शाला देवळाली यांनी प्रथम आणि माध्यमिक शिक्षक विभागातून निरंक तसेच प्रयोगशाळा सहाय्यक विभागातून पाटील बीके निवासी शाळा गोळेगाव यांनी प्रथम पारितोषिक मिळवले. परीक्षक म्हणून डी. एल. गवळी, एस एफ, शिंदे, ए. एन. देशमाने, एस. जी. सुरवसे, वि. आर. पारवे यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमद शेख, अंकुश उगलमुगले, सर्व केंद्रप्रमुख, गटसधन केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


 
Top