नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील बसस्थानकासमोर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विविध मागण्यासाठी दि.2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मातंग समाजाचे नेते विष्णु कसबे हे पुणे ते नागपुर पदयात्रा करत असुन त्यांना पाठींबा देण्यासाठी व मातंग समाजास एससी प्रवर्गात अ ब क ड करून स्वतंत्र आरक्षण मिळावे,क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे व डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे,साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, बार्टीच्या धरतीवर आरती स्थापन करण्यात यावे, गंज पेठ पुणे येथील व्यायाम शाळेस राष्ट्रीय दर्जा देऊन राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, नळदुर्ग येथील मातंग समाज राहत असलेली जागा पालिकेत नोंद करून आवास योजनेचा लाभ द्यावा, नळदुर्ग येथील क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे चौक व साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे चौकाची नोंद करून त्याचे सुशोभिकरण करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर लहुजी शक्ती सेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या रास्ता रोको आंदोलनात मातंग समाज बांधव विशेष करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलनानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन  मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांना देण्यात आले.यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, सुधाकर पाटोळे, दिलीप गायकवाड, विजय क्षीरसागर, अमोल सगट, सुनील खवळे, रामजी गायकवाड, दशरथ देडे, मुकेश देडे, सुरेश भिसे यांच्यासह मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितउपस्थित होता. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


 
Top