धाराशिव (प्रतिनिधी)-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मंजूर असलेल्या सामुहिक शेततळ्याचे प्रस्ताव तयार करून अपलोड करण्यासाठी व मंजूरीसाठी पाठवून देण्यासाठी कळंब कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी संतोष बाबूराव हुरगट यांनी पंचासमक्ष 20 हजार रूपयाची लाच स्विकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय धाराशिव यांनी लाचखोर अधिकाऱ्यास पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मंजूर असलेल्या सामुहिक शेततळ्याचे प्रस्ताव तयार करून अपलोड करण्यासाठी व मंजूरीसाठी पाठवून देण्यासाठी कळंब कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी संतोष बाबूराव हुरगट यांनी फिर्यादीकडे 20 हजार रूपयाची लाच 1 डिसेंबर रोजी पंचासमक्ष मागितली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 डिसेंबर रोजी लाचखोर अधिकाऱ्याविरोधात सापळा लावला. 20 हजार रूपयाची लाच घेताना संतोष हुरगट यास रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर संदीप आटोळे, पोलिस उपाधिक्षक सिध्दराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलिस अंमलदार सचिन शेवाळे, सिध्देश्वर तावसकर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे आदींनी कारवाई केली. 


 
Top