धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप 2021 मध्ये सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी आजवर शेतकऱ्यांना रु. 375 कोटी प्राप्त झाले असून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या प्रमाणे आणखीन रू. 375 कोटी मिळणे करारा प्रमाणे क्रमप्राप्त आहे. ही रक्कम न्यायालायत  जमा करण्यासाठी जानेवारीत सुनावणी होणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा प्रमाणे नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीने नकार दिला असून ते मा. उच्च न्यायालयात गेले होते व विविध मार्गाने प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने या विरोधात त्यानी मा. उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी नगर येथे याचिका दाखल केली आहे. विमा कंपनीकडून रु. 375 कोटी येणे असताना काहीही रक्कम भरून न घेता मा. उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांनी सुरू केलेल्या महसुली वसुलीच्या कारवाईला स्थगिती देवून विमा कंपनीला अंतरिम दिलासा दिल्याची बाब आपल्या वकिलांनी  सुनावणी दरम्यान मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. 

विमा कंपनीला अंतरिम दिलास देताना मा. उच्च न्यायालयात वसूली तील काही रक्कम जमा करून घेणे आवश्यक होते. शेवाळकर डेव्हलपर्स लि. नागपूर विरुद्ध रूपी सहकारी बँक पुणे प्रकरणातील याच न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत विमा कंपनीला वसुलीतील काही रक्कम जमा करण्याचे आदेश देण्याची विनंती ॲड. राजदीप राऊत यांनी मा. उच्च न्यायालयात केली. विमा कंपनीच्या वकिलाने या मुद्यावर युक्ती वादासाठी पुढील तारीख देण्याबाबत केलेल्या विनंती नुसार मा. उच्च न्यायालयाने दि. 15 जानेवारी 2024 रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. 


 
Top