धाराशिव (ंप्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदार संघातील तुळजापुर व उमरगा येथे दिव्यांग बांधवांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, धाराशिव व मा.खा.ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या विशेष सहकार्याने दि. 17/04/2023 ते 24/04/2023 या कालावधी मध्ये संपूर्ण मतदार संघात दिव्यांग बांधवाचे तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. योजने अंतर्गत मोफत कृत्रीम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी संपुर्ण लोकसभा मतदार संघातील धाराशिव जिल्हयातील तुळजापुर येथे तुळजापुर पंचायत समितीच्या कार्यालय परिसरामध्ये मध्ये एकुण 371 पात्र दिव्यांगना तसेच धाराशिव जिल्हयातील उमरगा तालुक्यात पंचायत समिती कार्यालय परिसरामध्ये 249 पात्र दिव्यांगना, विविध कृत्रिम अवयव व साहित्य वाटप खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना सायकल, व्हील चेअर, कुबडीजोडी, श्रवणयंत्र, सी. पी. चेअर, अंधकाटी, स्मार्ट फोन,स्टीक, आदी साहित्य गरजु व पात्र लाभर्थ्यांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी केशव उर्फ बाबा पाटील शिवसेना नेते, रणधीर पवार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीउमरगा तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे महिला आघाडी प्रमुख शामलताई वडणे, कमलाकर काका चव्हाण, सुधीर कदम, सभापती कृषी उत्पन्न बाजार तुळजापूर मुकुंद डोंगरे, शाम पवार, कमलाकर काका चव्हाण, सुनिल जाधव, मुकुंद डोंगरे, प्रदिप मगर, बापु नाईकवाडी, कृष्णात आण्णा मोरे, अनिल शेख, चेतन बंडगर, गोपाळ सुरवसे तसेच विष्णु पाटील, भगवान जाधव, विजयकाका जाधव, विरुपाक्ष स्वामी, सुधीर सुधाकर पाटील उमरगा तहसिलदार येरमे, तहसिलदार बोळंगे, गट विकास अधिकारी तुळजापूर ताकभाते प्रशांतसिंह मरुड आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया प्रमाणात हजर होते.