धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीचे नेते व प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील हे आई तुळजाभवानीच्या दर्शनास सहकुटुंब आले होते. त्यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे यांनी त्यांचा तुळजाभवानीची प्रतिमा कवड्याची माळ शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी चालुक्य युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, गुलंचद व्यवहारे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, प्रदीप शिंदे, इंद्रजित देवकते, साहेबराव घुगे, संतोष बोबडे, शिवाजी बोधले, विकास मलबा, राम चोपदार, विलास राठोड, ऋषिकेश साळुंके, नेताजी पाटील उपस्थित होते. तसेच विशेतः विक्रांतचे पिताश्री व भाजपचे जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष रायगड तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील हे ही दर्शनास आले होते. त्यांचाही प्रदेशाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


 
Top