धाराशिव (प्रतिनिधी)- थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. वडगाव सिद्धेश्वर जि. प. प्रशालेत हा राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी गणिततज्ञ श्री निवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक नाईकवाडे व्ही एच यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत माळी सर हे उपस्थित होते.  

गणित दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणिती उपकरणाचे प्रदर्शन भरविण्यात आले तसेच गणितीय रांगोळीच्या माध्यमातून विविध गणितीय प्रतिकृती व गणित प्रयोग सादर करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक नाईकवाडे व्ही एच  यांच्यासह प्रशालेतील गणित माध्यमिक शिक्षिका ज्योती राऊत व सहशिक्षिका रजनी रावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी  सहशिक्षका निर्मला गुरव, सहशिक्षका सुचिता शेलार, श्री कांबळे सर आदी उपस्थित होते.


 
Top