धाराशिव (प्रतिनिधी)- धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष, समाजवादी चळवळीतील नेते, यशवंत शिक्षण संस्था कुपवाडचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. प्रा. शरद पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. प्रा. शरद पाटील हे दोन वेळा मिरज विधानसभा मतदारसंघातून तर  दोन वेळा पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्या दुःखद निधनामुळे समाजवादी परिवाराची प्रचंड हानी झाली आहे. त्यांनी सतत जनतेच्या प्रश्नावर आंदोलन व मोर्चे काढून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला होता. शरद पाटील, संभाजी पवार व व्यंकप्पा पत्की हे तिघेही राजारामबापू पाटलांच्या तालमीत तयार झालेले नेते होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक मूल्य जपून जनतेची सेवा केली. त्यांना आज रोजी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांनी समाजवादी पार्टी महाराष्ट्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


 
Top