धाराशिव (प्रतिनिधी)- माजी प्रधानमंत्री भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेची शपथ घेतली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अव्वल कारकून डी.एम.मोरे, चंद्रकांत गजभार, महसूल सहाय्यक कल्पना काशीद, शाकीर शेख, रमजान तांबोळी, रंजना पवार आदी उपस्थित होते.


 
Top