भूम (प्रतिनिधी)- शहरातील सर्वच भागात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, सार्वजनिक वापरासाठी सभागृह देण्याचे आश्वासन आम्ही पूर्णत्वाकडे घेउन गेलो आहे असे शहरातील दत्त मंदिरच्या दुसऱ्या मजल्याच्या स्लॅब भरण्याच्या शुभारंभ प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे नागरिकांशी संवाद साधला.

या वेळी पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या सहकार्यातून वैशिष्ठ पूर्ण योजनेतून भूम शहरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी सभागृह बांधण्याचे आश्वासन दिले होते त्या त्या ठिकाणी सार्वजनिक सभागृह भूम शहरामध्ये मध्ये बांधण्यात येत आहेत. या सभागृहांचा उपयोग त्या त्या वार्डामध्ये किंवा गल्लीमध्ये नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी उपयोग होणार आहे असेही यावेळी बोलताना गाढवे यांनी सांगितले. यावेळी शिवाप्पा उंबरे,दीपक खराडे, शिवशंकर खोले, अशोक तोडकर, मधुकर शेटे, प्रदीप उंबरे, बाळासाहेब गवळी,विजयकुमार सोलापूर, सिद्धेश्वर मनगिरे, नितीन होळकर, श्याम होळकर, संजय होळकर, ओम स्वामी, धनंजय शेटे, आदी समाज बांधव उपस्थित होते.


 
Top