धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2023-24 चा 20 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवार दि.4 रोजी कारखान्याचे संचालक फत्तेसिंह देशमुख, शंकर सुरवसे, व नामदेव पाटील यांचे हस्ते प्रथमतः वजन काट्याचे पुजन करुन तद्नंतर विधीवत गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुन गव्हाण पुजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक संचालक ॲड. निलेश पाटील यांनी केले. त्यात त्यांनी कारखाना स्थापनेपासुन आजपर्यंतची कारखान्याची वाटचाल, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांचे पारदर्शक व्यवहारातुन कारखान्याची निर्माण झालेली विश्वासार्हता व याच जोरावर कारखान्याची पुढील होणारी वाटचाल याचा आढावा उपस्थितांसमोर माडला.

तद्नंतर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांनी सभेस मार्गदर्शन करताना सांगीतले की, ऊस शेती हेच शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असुन कमी पाण्यात व कमी खर्चात शेतीचे नियोजन करणे गरजेचे आहे. आपला परिसर आवर्षण प्रवण असल्याने गेल्या पन्नास वर्षापासुन टंचाई, कमतरता, दुष्काळ तसेच ऊस नाही म्हणुन कारखाना बंद ठेवायचा तर कधी जास्त ऊस झाला म्हणुन पावसाळ्यातही कारखाना चालु ठेवुन ऊस संपायचा नाही हे चक्र चालुच आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात छोटे मोठे गुळपेटी कारखान्यांचे पेव फुटले असुन अशातच कारखान्यांनी वाढविलेली गाळप क्षमता यामुळे कितीही ऊस जास्त झाला तरी कारखान्याचे गाळप 100 ते 120 दिवसांच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात ऊस मोठ्या प्रमाणावर झाला अशी परिस्थिती कधीच येणार नाही. कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणेसाठी कारखान्याचे गाळप किमान 160 दिवस चालणे आवश्यक आहे. शेवटी कारखान्याचे संचालक ॲड. चित्राव गोरे यांनी कार्यक्रमास उपस्थितीत असलेले सभासद, शेतकरी, संचालक मंडळ, हितचिंतक, पत्रकार, अधिकारी/कर्मचारी व वाहन ठेकेदार यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक आयुबखों पठाण यांनी केले.


 
Top