तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणला पाठींबा देण्यासाठी सामाजिक कार्यकते सुनिल हनुमंतराव घाडगे यांनी बुधवार पासुन तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले होते. माञ जरांगे पाटलांनी उपोषण सोडताच शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर रोजी तहसिलदार बाळासाहेब बोळंगे यांच्या हस्ते नारळ पाणी घेवुन आपले उपोषण सोडले. यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होते.