तुळजापूर (प्रतिनिधी)- आई भवानी मराठ्यांना आरक्षण मिळू दे व माझ्या सौभाग्याच कुंकु वाचु दे असे साकडे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या अर्धागिनी जयश्रीताई जरांगे पाटील हीने श्रीतुळजाभवानी मातेची पुजा केल्यानंतर देविचरणी लीन होवुन घातले.

शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर रोजी जरांगे पाटीलांच्या पत्नी जयश्री,  मुलगी पल्लवी, बहीण भारती कठारे यांनी जरांगे पाटलांचे उपोषण सुटताच जरांगे पाटील घराण्याचे कुलदैवत असलेल्या श्रीतुळजाभवानी देवीचरणी आले. देविचा कुलधर्मकुलाचार करुन माझे सौभाग्याचे कुंकु वाचवल्या बद्दल  देविचरणी सांष्टांग दंडवत घालुन आभार मानले. शुक्रवार सकाळी देविचा कुलधर्मकुलाचार करावा म्हणून तिर्थक्षेञ तुळजापूरकडे निघालेल्या जरांगे पाटील कुंटुंबियांना जागोजाग मराठा बांधवांनी अडवल्याने त्यांना तिर्थक्षेञ तुळजापूरला दुपारी साडेतीन वाजता पोहचले नंतर संभळाच्या कडाकडाटात त्यांचे स्वागत करुन त्यांना देविमंदिरात नेण्यात आले. तिथे श्रीतुळजाभवानी मातेस साडीचोळी अर्पण करुन खणानारळाने ओटी भरुन देविचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पुजेचे पोराहित्य देविचे पुजारी विशाल रोचकरी यांनी केले. नंतर श्रीतुळजाभवानी मंदिर कार्यालयात मंदिर संस्थानच्या वतीने देविला नेसवलेले वस्ञ, देविचा फोटो देवुन जयश्री व पल्लवीचा तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सोमनाथ माळी यांनी सन्मान केला. यावेळी विशाल रोचकरी, नगराध्यक्ष सचिन रोचकरी. विनोद गंगणे, आनंद कंदले, राहुल भोसले,शांताराम पेंदे, राजशेखर कदम, आबा रोचकरी उपस्थित होते.


 
Top