तुळजापूर (प्रतिनिधी)-माझ्या पप्पा मराठ्यांसाठी गेली बावीस वर्षा पासुन लढा देतायत. त्याला यश न्याय मिळू दे असे साकडे श्रीतुळजाभवानी मातेला घातल्याची माहिती मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी जरांगे पाटील हीने श्रीतुळजाभवानी देवीदर्शनानंतर पञकारांशी बोलताना म्हणाली.
यावेळी पञकारांशी बोलताना पल्लवी म्हणाले कि आंदोलन काळात पप्पा ना कधीही भेटायला जात नाही सध्या गेली अनेक महिन्या पासुन आम्हीच भेट नाही. आम्ही पप्पांचा शब्द बाहेर जात नाही ते जेव्हा बोलवतील तेव्हाच आम्ही त्यांना भेटायला जाणार असे यावेळी म्हणाली.
यावेळी पञकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जरांगे पाटलांच्या भगिनी भारती कठारे म्हणाल्या कि, माझा जरांगे पाटलांचे उपोषण यशस्वी होवू दे असे साकडे देविला घेतले होते. त्याची नवसपुर्ती साठी आम्ही आमच्या कुलदैवत दारी आलो. माझ्या ढाण्या वाघासारख्या भावाने सरकारला झुकवले. आम्ही या आंदोलनात कमी पडलो नाही. सरकारने वेळ मागुन घेतला आता सरकारने मराठ्यांचा अंत पाहू नये. मराठ्यांनी फक्त संघर्षच करायाचा का असा सवाल यावेळी केला. या नंतर दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षण प्रश्न सुटला नाहीतर माञ चलो मुंबई असा नारा यावेळी दिला. देविला आपण जसे शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी आशिर्वाद रुपी तलवार दिली तसेच पाठबळ,गेली चाळीस वर्षापासून चालु असलेल्या अयशस्वी मराठा आरक्षण लढ्याला पाठबळ दे असे साकडे घातल्याचे सांगितले. यावेळी भावांनो आत्महत्या करु नको असे भावनिक आवाहन करताना कठारे म्हणाल्या कि, तुम्ही आत्महत्या केली तर तुमचे कुंटुंब उघड्यावर पडते हे लक्षात असु द्या. भावाने म्हणून म्हणते भावानो आत्महत्या करु नका असे कळकळीचे आवाहन यावेळी केले. यापुढे हा लढा शांततेने ऐकजुट एकसंघपणे लढायाचे हे लक्षात ठेवा असे सांगुन मराठ्यांचे पोरे जाळपोळ करणारे दंगेखोर नाहीत हे दिसुन आल्याचे शेवटी म्हणाल्या.