धाराशिव (प्रतिनिधी)-बोगस प्रमाणपत्र जोडून नोकरीला लागला, तुम्हाला नोकरी करायची असेलतर मला दहा लाख रूपये द्या अशी मागणी केल्याप्रकरणी धाराशिव पोलिस ठाण्यात दि. 18 नोव्हेंबर रोजी चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी संतोष तानाजी गोरे रा. राघुचीवाडी, ता. जि. धाराशिव, सय्यदमन्सुर अली अहमद अली रा. धाराशिव व इतर दोघांनी 29 ऑगस्ट व 14 सप्टेंबर रोजी नगरपरिषद शाळा धाराशिव, प्रदीप हॉटेल व रामानंद हॉटेल धाराशिव येथे फिर्यादी अनंतकुमार बंडूपंत घाटेराव रा. दत्तनगर धाराशिव यांना व त्रूंचया सहकाऱ्यांना आरोपींनी तुम्ही महादेव कोळी जातीचे बोगस जात प्रमाणपत्र जोडून नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागला आहात. तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्ही चौघांनी मला अउीच लाखांप्रमाणे एकूण 10 लाख रूपये द्या, अशी पैशांची मागणी केली. तसेच शिवीगाळ करून पोलिसात तक्रार दिली तर ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अनंतकुमार घाटेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.


 
Top