भूम (प्रतिनिधी)- राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील दमदार कामगिरीवर व विकासात्मक दृष्टीकोणावर विश्वास ठेऊन सोमवारी भैरवनाथ शुगर सोनारी येथील कार्यालयात तालुक्यातील मौजे आनंदवाडी, गोसावीवाडी, बिरोबाचीवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,मा.सरपंच यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, माजी जि.प.सदस्य गौतम लटके, उपजिल्हा प्रमुख दत्ता मोहिते, तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, सतीश दैन, विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यामध्ये प्रामुख्याने माजी सरपंच,सदस्य सोमनाथ फरतडे,सरपंच आप्पासाहेब उपासे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कागदे, उप सरपंच रामभाऊ खोत,यांच्यासह अमोल बाबर,सतीश उपासे,नवनाथ पाटील,आकाश खोले, बापू जाधव,दादा खोत,दादा खोले,ज्ञानदेव खोत,नारायण खोत,कैलास खोत, दत्ता भारे, रघुनाथ खोत यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. सर्व पदाधिकाऱ्यांचा धनंजय सावंत हस्ते सत्कार करण्यात आला.