धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या व सर्वच राजकारण्यांचे लक्ष लागून राहिलेल्या भारतीय जनता पक्षाची न्यू यंग ब्रिगेड अखेर भाजप जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य-पाटील यांनी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा यासह जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि नव्या दमाच्या शिलेदारांची सांगड घालत नूतन जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य यांची ही नवी टीम मैदानात उतरविण्यात आली आहे.

नूतन जिल्हाध्यक्षांनी नव्या आणि जुन्या दमाच्या शिलेदारांची सांगड घालत तब्बल 47 जणांची जंम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा चिटणीस, तालुकाध्यक्ष, जिल्हा कोषाध्यक्ष, समन्वयक, महिला मोर्चा, युवा मोर्चा व प्रसिद्धीप्रमुख पदाचा समावेश आहे.

अशी आहे भाजपचे नूतन जंम्बो कार्यकारणी-

संताजीराजे चालुक्य-पाटील- जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष- विक्रम देशमुख-तुळजापूर, रामहरि शिंदे-कळंब, अभय चालुक्य-उमरगा, विकास बारकूल-येरमाळा, डॉ सरोजनी राऊत-कळंब,सुनील काकडे-धाराशिव, दत्ता देवळकर-धाराशिव, बालाजी गावडे-धाराशिव, सुरेश कवडे-वाशी, आदेश कोळी-तुळजापूर, सुदाम पाटील-भूम, सुखदेव टोम्पे-परंडा, माधव पवार-उमरगा, मिनाज शेख-कळंब, कैलास शिंदे-उमरगा, डॉ गोविंद कोकाटे-धाराशिव, महादेव आखाडे-वाशी.

जिल्हा सरचिटणीस-विकास कुलकर्णी-परंडा, प्रदीप शिंदे-धाराशिव, दीपक आलुरे-तुळजापूर, इंद्रजित देवकते-धाराशिव, माधुरी गरड-धाराशिव.

जिल्हा चिटणीस- साहेबराव घुगे-तुळजापूर, राजकुमार पाटील-परंडा, सिद्धेश्वर कोरे-तुळजापूर, अंगद मुरूमकर-भूम, सचिन इंगोले-वाशी, युवराज जाधव-उमरगा, वनिता कटाळे-कळंब, पल्लवी रोचकरी-तुळजापूर, राणी राठोड-उमरगा, वैभव मुंडे-कळंब, सुजित परदेशी-परंडा.

जिल्हा कोषाध्यक्ष-नेताजी शिंदे-लोहारा.जिल्हा समन्वयक-शिवाजीराव गिड्डे पाटील-कळंब.

नूतन तालुकाध्यक्ष- शहाजी पाटील-उमरगा, संतोष बोबडे-तुळजापूर, अजित पिंगळे-कळंब, शिवशंकर हत्तरगे-लोहारा, महादेव वडेकर-भूम, राजाभाऊ पाटील-धाराशिव ग्रामीण, ॲड गणेश खरसडे-परंडा, राजगुरू कुकडे-वाशी व अभय इंगळे-धाराशिव शहर.

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष - नंदाताई पनगुडे-धाराशिव. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष - राजसिंहा राजेनिंबाळकर-धाराशिव. जिल्हा प्रसिद्धी तथा मिडिया विभागप्रमुख-धनंजय रणदिवे-धाराशिव.


 
Top