धााराशिव (प्रतिनिधी)- शहरात पार पडलेल्या तालुका मेळाव्यात वारकरी साहित्य परिषदेची तालुका कार्यकारिनीची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्षपदी जेष्ठ कीर्तनकार मोहनअप्पा वाघुलकर महाराज यांची निवड करण्यात आली. मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना  विठ्ठल पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विलास पिंगळे महाराज होते. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीहरी चौरे महाराज, दिलीप सावंत महाराज, कुमार बायस, विजय पोफळे, सर्जेराव महाराज उपस्थित होते. वाघुलकर महाराजांनी विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांना गावागावात जाऊन एकत्रित केले. तसेच शासनाच्या वृद्ध कलावंत मानधन योजनेत अनेकांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे त्यांची पुन्हा तालुकाध्यक्षपदी निवड केली. याप्रसंगी उपाध्यक्ष गोपाळ शिंदे, सचिव अंगद पवार, कोषाध्यक्ष रामकृष्ण शिंदे, सहसचिव सौदागर शिंगाडे, सल्लगार ॲड. बालाजी भक्ते, सदस्य कालिदास थोरे, पिंटू नाईकवाडी, पोपट गडकर, मधुकर निंबाळकर, नंदकुमार पाटील, संतोष करंजकर, व्यंकट लोखंडे यांची निवड करण्यात आली.


यांचा विठ्ठल पुरस्कार देऊन गौरव

बालकांसाठी वारकरी शाळा काढणारे दादा महाराज सोनटक्के, वारकऱ्यांचे प्रश्न मांडल्याबद्दल पत्रकार बाबुराव पुजारी, उपेंद्र कटके, मधुसुदन सांगवे, चेतन दळवे, नवनाथ शिरसाठ, प्रमोद माने, डॉ. गोविंद कोकाटे, धाराशिवच्या माजी नगरसेविका प्रेमाताई पाटील, महिला तालुकाध्यक्ष शोभाताई लंगडे, महेश पाटील यांना विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल विठ्ठल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.


 
Top