तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे गुरुवार दि 23 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त ओडिसी नृत्यांगना व संचारी फाउंडेशन, नवी दिल्लीच्या संचालिका श्रीमती कविता दिवेदी यांच्या ओडिसी या शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .        नृत्यांगनेने 42 देशांमध्ये आपली कला सादर केली असून अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.हा कार्यक्रम स्पीक मॅके  अंतर्गत  नवोदय विद्यालय समिती ,पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व शास्त्रीय नृत्य ,गीत यांचा परिचय व्हावा . शास्त्रीय नृत्य, गीताचे संवर्धन व्हावे तसेच विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्य, संगीत व गीताची आवड निर्माण व्हावी हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी प्रसिद्ध नृत्यांगना श्रीमती कविता द्विवेदी विद्यार्थ्यांची हितगुज करणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य श्री. गंगाराम सिंह व वरिष्ठ अध्यापक श्री. एस .एच .गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.  कार्यक्रमाचे संयोजक श्री .पी. एन .जोशी (संगीत शिक्षक) आहेत.


 
Top