धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील विजेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी मंगळवार दि. 28 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात आले होते. पण त्यावेळी जिल्हा अंधारात बुडाल्याचे चित्र होते. पावसाने तब्बल पाच तास अनेक तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. एकीकडे बैठकीचा सपाटा तर दुसरीकडे विजेचा खेळखंडोबा अशी भावना ग्राहकवर्गातून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या अनेक योजना धाराशिव शहर व जिल्ह्यासाठी वीजवितरण यंत्रणा बळकटीसाठी वापरल्या आहेत. परंतु अद्यापही जसे थे कारभार असल्यामुळे वीज ग्राहकांत संतापाचे वातावरण परसले आहे.

पावसाने शहरासह जिल्ह्याच्या काही तालुक्यात जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी वीज गुल झाली. विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित केला जाऊ शकतो. मात्र काही ठिकाण पहाटे पाच वाजता तर काही ठिकाणी सकाळी सात वाजता वीज गुल झाली. त्यानंतर थेट 11 वाजता वीजपुरवठा सुरू झाला. त्यानंतरही अधूनमधून वीज गायब होण्याचे चक्र सुरूच होते. नेमका हा कसला प्रकार आहे? असा प्रश्न ग्राहकवर्गातून विचारला जात आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू असताना मुंबई येथील वीज कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यातील विजेचा आढवचा धणेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी होते. मंगळवारी झालेला हा प्रकार एक प्रातिनिधीक स्वरूपातील उदाहरण असले तरी वीजपुरवठाचा खेळखंडोबा जिल्ह्यातील ग्राहकांसाठी नवीन नाही. वीज वितरण जाळे बळकट करण्यासाठी देशभर आरडीएसएस योजना सुरू झाली आहे. त्यासाठी धाराशिव जिल्ह्यात 1177 कोटी रूपयांची कामे होणार आहेत. जिल्ह्यात सौर ऊर्जा निर्मितीची 2300 मेगावॅट इतकी मोठी क्षमता आहे.


 
Top