धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर पालिकेतील कथित 27 कोटीच्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन लेखापाल सुरज संपत बोर्डे यांना धाराशिव जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधीश मोरे मॅडम यांनी तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. 1 डिसेंबर रोजी बोर्डे यांना पुन्हा कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.
धाराशिव नगर पालिकेतील कथित 27 कोटीच्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन लेखापाल सुरज संपत बोर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विश्वास मोहिते यांनी 24 नोव्हेंबर रोजी नामंजूर केला होता. त्यानंतर एसआयटी पथकाने रविवारी मध्यरात्री बोर्डे यास नगर येथून ताब्यात घेतले आहे. आज (मंगळवारी) बोर्डे यास धाराशिव जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधीश मोरे मॅडम यांच्यासमोर हजर केले असता, पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली पण आरोपीचे वकील यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आली.