भूम (प्रतिनिधी) भूम अगारात 3 निम आराम बस दाखल झाल्या असून या बसेस खास करुन भूम ते मुंबई अशा धावणार आहेत. यामुळे भूम ते मुंबई हा प्रवास या निमआराम बसमुळे सुखकर होणार आहे. 

पुर्वीच्या निमआराम बसेस पेक्षा या बसेसला सुखसोयी अधिक असुन प्रत्येक सीट आरामदायक आहे. प्रत्येक सीटला मोबाईल चार्जर राहणार आहे. तर प्रत्येक सीटला वेगळी लाईट सुविधा दिली असून प्रत्येक सीट लेदरच आहे. पुर्वीच्या निमआराम बसला 33 सीट होते ते आता 45 करण्यात आले. त्यामुळे अत्याधुनिक निमआराम बसमुळे भूम ते मुंबई जाणाऱ्या प्रवाशी यांना हा प्रवास सुखकर होणार आहे. अनेक प्रवाशी मुंबई जाणाऱ्या महामंडळाच्या बसेस प्रवास न करता खाजगी ट्रॉव्हल्सन प्रवास करणे पसंद करत होते. परंतू भूम आगारात नव्याने दाखल झालेल्या 3 निमआराम बसेस नविन सुविधा दिल्याने पुन्हा एकदा एसटी चे प्रवाशी वाढून महामंडळाच्या आर्थीक उत्पन्नात भर पडणार आहे. यास प्रवाशी वर्गाचा कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच समजणार आहे. तिकीट दरात थोडी वाढ असून पुर्वीच्या निमआराम बसला 700 तिकीट होते तर आता 850 रु तिकीट बसणार आहे. ऐन दिवाळी सणाच्या काही दिवस अगोर या निमआराम 3 बस दाखल झाल्याने प्रवाशांचा लांब पल्ल्यासाठीचा प्रवास सुखकर होणार आहे. 



 
Top