तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे आयोजित तेर प्रीमीयर स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कॉनरवाडा संघ प्रथम विजेता ठरला तर के.के.वारीर्यस संघ व्दितीय विजेता ठरला.
यावेळी गोरख माळी, उपसरपंच श्रीमंत फंड, विजय मुळे, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, प्रविण साळुंके, श्रीकांत लाड,नवनाथ पसारे, गणेश फंड, व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.