तेर (प्रतिनिधी)- अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदिराचा लोकापण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.तसेच यंदाचे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 350 वर्ष आहे.त्यानिमीत्त आपल्या गावात,वस्तीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यासाठी व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी तेर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी  विलास सुरवसे  होते तर प्रमुख अतिथी म्हणून के.बी. डॉ. बाहेती, विकासराव देशपांडे उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक हभप दिपक महाराज खरात यांनी केले.तर सूत्रसंचालन  सागर गाढवे यांनी केले तर आभार योगेश लोमटे यांनी मानले.कार्यक्रमासाठी प्रवीण बंडे, रामेश्वर दुधाळ, मच्छिंद्र देवकते,लहू पडूळकर, समर्थ माने, बाबा पवार यांनी परिश्रम घेतले.


 
Top