धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा मॉडर्न पेन्टॅथलॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रॉयल स्विमिंग पूल तुळजापूर या ठिकाणी विभाग स्तर शालेय मॉडर्न पेन्टॅथलॉन स्पर्धेचे सोमनाथ माळी तहसीलदार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मॉडर्न पेन्टॅथलॉनचे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर भुतेकर, तालुका क्रीडा अधिकारी बी. के. नाईकवाडी, रॉयल स्विमिंग पूल चे संचालक प्रवीण केवडकर, तालुका क्रीडा संयोजक राजेश बिलकुले, क्रीडा प्रशिक्षक इसाक पटेल, क्रीडा प्रशिक्षक अजिंक्य वराळे ,ॲथलेटिक्स प्रशिक्षक योगेश थोरबोले, थ्रो बॉल प्रशिक्षक बालाजी पवार, गणेश रणखांब, आबा कापसे इत्यादी यावेळी उपस्थित होते.

यावेळी माळी यांनी खेळाडूंना शालेय व दैनंदिन जीवनात खेळाचे व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सहभागी खेळाडूंचे व जिल्हा संघटनेचे कौतुक केले. तसेच गोवा येथे झालेल्या 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य  पदक मिळवलेल्या कु. योगिनी साळुंखे, कु.ज्योत्स्ना लईतबार व मागील वर्षी राज्य स्पर्धेत सहभागी कु श्रावणी रणखांब या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


 
Top