धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील अदिती सुमंत जाधवचा धाराशिव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात  प्रवेश मिळाल्याबद्दल श्री साई श्रध्दा एज्युकेशनचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदितीचा पहिल्याच राऊंड मध्ये सांगलीच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसला प्रवेश झाला होता. आता तिच्या पसंतीनुसार धाराशिव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश झाला असून ती शासकीय तंत्रनिकेतन येथील कर्मचारी श्री सुमंत जाधव यांची कन्या आहे.

अदिती ही चांगले गुण घेऊन विषेश प्राविण्यासह बारावी विज्ञान उत्तीर्ण झाली आहे. तिने श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाईन टेस्ट सीरिज मधून नीटची तयारी करून नीट 2023 च्या परिक्षेत चांगले यश संपादन करत 504 गुण मिळवले आहेत. पुढे प्रा. सोमनाथ लांडगे सर यांच्या मार्गदर्शनातून प्रवेशासाठी ॲडमिशन काउन्सलिंग प्रक्रिया पार करण्यात आली. आता पर्यंत अनेक शहरी व ग्रामीण भागातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रा. सोमनाथ लांडगे सर यांच्या मार्गदर्शनातून एमबीबीएस, बीडीएस व बीएएमएस ला श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाईन टेस्ट सीरिज मार्फत प्रवेश मिळवून दिला आहे.

कु.आदिती हिच्या या यशाबद्दल तिचे वडील श्री सुमंत जाधव, भाऊ यांच्या सह श्री साई श्रध्दा एज्युकेशनने सत्कार करून कु. अदितीला पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री साई श्रध्दा मुलींच्या वस्तीगृहाच्या संचालिका सौ. उषाताई लांडगे उपस्थित होत्या. कु. आदितीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top