धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे साडे तीन शक्तीपीठा पैकी एक पुर्णपीठ असुन दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा शारदीय नवरात्र उत्सव दि. 13.10.2023 ते दि. 29.10.2023 या कालावधीत पार पडला. धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी  व अपर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदशर्नाखाली सदर नवरात्र उत्सवाकरिता 75 पोलीस अधिकारी, सुमारे 900 पेालीस अंमलदार, 919 गृहरक्षक दलाचे जवान  इतक्या संख्येने  बंदोबस्त पुरविण्यात आला होता. 

संपुर्ण नवरात्र उत्सवा दरम्यान भाविकांची मोठ्या संख्येने होणारी गर्दी लक्षात घेता योग्य प्रकारे वाहतुक नियमन व पार्कींग व्यवस्था करण्यात आली होती. यात्रा कालावधीत एकुण सुमारे 10 ते 12 लाख भाविकांनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शनाकरीता तुळजापूर येथे भेट दिली. तसेच  दि. 28.10.2023 ते दि. 29.10.2023 रोजी साजरी झालेल्या कोजागिरी पोर्णिमेनिमीत्त सुमारे 3 लाख भाविकांनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यात्रे दरम्यान संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. त्यामुळे यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सदर यात्रेदरम्यान राज्यातुन सुमारे 500 एस. टी. महामंडाळाचे बसेस तर कर्नाटक व तेलंगना राज्यातुन सुमारे 400 ते 500 बसेस सोडण्यात आल्या होत्या. 


बाहेर राज्याच्या बसेस सुखरूप पोच

यात्रे दरम्यान मराठा आरक्षण मागणीसाठी संपुर्ण राज्यात रास्ता रोको आंदोलने चालु होती. या काळामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यातुन दर्शनासाठी आलेल्या भविकांच्या वाहनावर दगडफेक होऊ नये किंवा त्या भाविकांना कुठल्याही प्रकारची  इजा होऊ नये याची पुरेपुर खबरदारी जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली होती. पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेरील राज्यातील भाविकांना घेवून जाणारे बसेस यांना उमरगा तालुक्यातील राज्य सीमेवर सुखरुप रित्या पोहचविण्यात आले. सदर आंदोलनाची कुठलीही झळ भाविकांना बसू दिली नाही.


75 गुन्हेगारांवर कारवाई

तसेच संपुर्ण नवरात्र उत्सवादरम्यान पोलीस अधिक्षक यांचे आदेशाने व त्यांचे मार्गदशानाखाली स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांचे पथकानेही चोरी, जबरी चोरी, पाकीटमारी सारख्या घटनांना आळा घालण्याकरीता परिणामकारक  गस्त राबविली. त्याचा परिणाम स्वरुप या वर्षी चैन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग ची 1 आणि मोटर सायकल व इतर चोरीच्या केवळ 2 घटना घडल्या. ज्याचे प्रमाण गेल्या वर्षीचे तुलनेत अतिशय कमी असुन यावर्षी सदर जबरी चोरी, चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यात्रा कालावधी दरम्यान एकुण 75 रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.


 
Top