धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील कामेगाव येथील रुक्मीणी बाबुराव जाधव (वय 80) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (दि.16) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कामेगाव येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


 
Top