तेर (प्रतिनिधी)-कार्तिक सोहळ्यासाठी  धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे पंढरपूरला 15 नोव्हेंबरला प्रस्थान झाले.   श्री संत गोरोबा काका यांच्या राहत्या घरातून पालखीतून श्री संत गोरोबा काका यांच्या मुखवटा मंदिरात आणला जातो. त्याचा शुभारंभ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर श्री संत गोरोबा काका मंदिरातून पालखी सोहळयाचा शुभारंभ श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे निरीक्षक अतुल नळणीकर यांच्या हस्ते मंदिरातून करण्यात आला.

यावेळी दत्तात्रय मुळे, दिपक महाराज खरात, पृथ्वीराजसिंह पाटील, रघुनंदन महाराज पुजारी, उपसरपंच श्रीमंत फंड, धनंजय पुजारी, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिवाजीराव नाईकवाडी,पद्माकर फंड,विठ्ठल लामतुरे,साहेबराव सौदागर, प्रशांत वाघ, प्रविण साळुंके, जयेश कदम, महादेव खटावकर, नवनाथ पसारे,विजयसिंह फंड, संजय इंगळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, सचिन पांढरे, लक्ष्मण राऊत, गणेश फंड, नागनाथ कुंभार, अण्णासाहेब तनमोर, संजय लोमटे, रामा कोळी, नानासाहेब भक्ते, राजेंद्र पसारे, हरी भक्ते आदीसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी सोहळा दि. 15 हिंगळजवाडी, दि. 16 धाराशिव, दि. 17 भातंबरे, दि.18 वैराग, दि.19 यावली , दि.20 खैराव, दि 21 अनगर, दि 22 नोव्हेंबर रोजी रोपळे येथील मुक्कामानंतर, गुरुवार दि. 23 रोजी गोरोबा काकांचा पालखी सोहळा पंढरपूर येथे कार्तिक सोहळ्यासाठी चंद्रभागेच्या काठी दाखल होऊन संत गोरोबा काका मठातील पाच दिवसांच्या मुक्कामानंतर सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी तेरच्या दिशेने म्हणजेच स्वगृही परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊन येवती, खंडोबाचीवाडी, कुंभेज, कापसेवाडी, काळेगाव, साकत, पिंपरी, कौडगाव, सांजा, काजळा, मार्गे मजल दर मजल करत बुधवार दिनांक 6 डिसेंबर रोजी गोरोबा काकांच्या पायी पालखी सोहळ्याचे तेर नगरीत आगमन होणार आहे.


 
Top