तेर (प्रतिनिधी)- पंढरपूरातील कार्तिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी टाळ मृदंगाच्या तालावर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत ज्ञानोबा गोरोबा तुकारामांचा जयघोष करत मजल दर मजल करत भाऊबीजेच्या दिवशी पंढरपूर दिशेने मार्गस्थ झालेल्या तेर ता .धाराशिव येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काकांच्या पायी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसह नागरिकांना गावातीलच नृसिंह वेस येथील ग्रामस्थांनी दूधाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सोहळ्यातील प्रत्येक वारकऱ्यांना डोपी व उपरणं घालून सन्मान करण्यात आला.

यावेळी सुजित इंगळे, महादेव झाडे, मनोज साखरे, नागेश पांगरकर, स्वप्नील इंगळे, मंगेश पांगरकर, अविनाश इंगळे, अमोल पांगरकर, किरण खोटे, विठ्ठल खोटे, संतोष इंगळे, चैतन्य शिराळ, अमोल उटगे, शंकर मांजरे, सदाशिव वैरागकर,बाळासाहेब खोटे, अक्षय कोळपे, रोहित गाढवे, सौरभ इंगळे, गोविंद इंगळे, वैभव वैरागकर, अमोल चौगुले, मुकुंद शेळके, शिवाजी इंगळे, सुनील कोळपे, धीरज पांगरकर, तुषार बुके, सुरज शिराळ, शिवाजी पांगरकर, अनिकेत शिराळ, महेश गाढवे, आदिंसह शिव नृसिंह ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top