धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यात घरफोडी व दरोडा घालणाऱ्या एका अटल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील चोरीस गेलेला 75 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही जिल्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे.

सुभाष शंकर क्षिरसागर, वय 65 वर्षे, रा. लहुजी चौक समोर येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांचे व तानाजी क्षिरसागर, आनंद खंडागळे यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात 

चोरट्यांनी तोडून 83 हजार 900 रूपये माल लंपास केला होता. सदर गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येरमाळा पोलीस ठाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्स प्रिंट वरुन सदरचा गुन्हा हा आरोपी धिरज उर्फ अजय कांतीलाल पवार, रा. सावदरवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांने केला असल्याचे निष्पन्न झाले. गुप्त खबऱ्यामार्फत आरोपी हा परंडा तालुक्यातील सावदरवाडी येथे राहत असल्याचे समजले. गुन्हा शाखेच्या पथकाने त्वरीत आरोपी धिरज उर्फ अजय कांतीलाल पवार यांच्या घरावर धाड मारली व ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता माझ्या दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. व त्याच्याकडून 75 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपी विरूध्द, बार्शी, येरमाळा, नेवासा, माढा आदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याचे सांगण्यात आले. 

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांचे आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  वासुदेव मोरे, पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ, विनोद जानराव, फराहान पठाण, समाधान वाघमारे, जाधवर, गुरव यांच्या पथकाने केली आहे.


 
Top