परंडा (प्रतिनिधी)- सभेला यायला उशिर होतोय परंतू ठिक ठिकाणी मराठा बांधव बघीतल्यानंतर वाटेत थांबावेच लागतय त्यांना डावलून जाऊ शकत नाही. रात्रीच्या 2 वाजल्या असताना आपण सर्व विशेषतः महिला सभेसाठी मोठ्या संख्येने आहात.आपल्या लेकराबाळांसाठी भविष्य आरक्षण महत्वाचं आहे हे यावरून दिसतं. लेकराबाळांचं भविष्य असलेले मराठा आरक्षण 70 वर्ष थोपवून ठेवलंय आपल्या लेकरांनी अन्याय सहन केलाय आता सुट्टी नाही काय करायचं ते करा पण आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही . 1805 ,1967 ते 2023 पर्यंतचे आता आपल्याला कुणबीचे पुरावे मिळालेत . त्यामुळे 24 डिसेंबर हा सुवर्ण दिवस उगवणार व ओबीसी तथा 50 टक्के च्या आतील आरक्षण मिळणारचं असल्याचा विश्वास मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी परंडा (जि. धाराशिव) येथील झालेल्या विराट मराठा आरक्षण सभेत बोलताना हजारोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांना दिला .

परंडा शहरातील पंचायत समिती मैदानावर जरांगे पाटील यांची भव्य दिव्य सभा रात्री 1 : 30 वाजता सुरु झाली . सभेची वेळ बुधवार ( दि.14 ) सायंकाळी 4 : 30 वा. असताना तब्बल 11 तास उशिराने सभा झाली . तरीही मराठा समाज मोठ्यासंख्येने उपस्थित होता . ते आर्धा तास बोलले . तालुक्याच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. जेसीबी मशिनद्वारे पुष्पवृष्टी , फटाके फोडून शहरात ,सभेस्थळी व मार्गावर ठिकठिकाणी तालुक्यात जरांगे पाटील यांचे स्वागत झाले. 

पुढे बोलताना ते म्हणाले कि ,आमच्यावर कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही भिणार नाही . आमचे आंदोलन शांततेने लोकशाही मार्गाने सुरुच रहाणार . कांही नेते खोट्या केसेस करायला लागले पण त्यांची गाठ आरक्षण मिळाल्यावर आपल्याच बरोबर आहे ,आहे हे लक्षात ठेवा . तुम्हाला जर या मराठ्यांनी आयुष्यभर गुलाल लागू दिला तर आम्हाला खांदाणी मराठा म्हणू नका आता सरकार तुमच्या हातात म्हणून खोटे गुन्हे दाखल करताय पण तुमचा बारदाना एकत्र झाला तेंव्हा सत्ता आलीय त्याचा दुरुपयोग करून मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी विरोध म्हणून करत असाल तर गाठ आमच्याशी आहे . कोल्हापूरला एका माकडानं एक माकड उठवलय त्यानी आपलीच माणसं आपल्या विरोधात कामाला लावलेत . एक दोन माणसं आपल्या विरोधात बोलायला लागलेत . आपली ओबीसी - कुणबी मराठा आरक्षण मागणी हि बरोबरच असल्याची करोडो मराठ्यांचं म्हणन आहे . याच मार्गाने आम्ही आरक्षण मिळवणार व मिळणारच. ज्यांना नको त्यांनी घेऊ नये. आम्हाला पाहिजे, गोरगरीब मराठे आपले भविष्य आरक्षणातून उज्वल करतील. बीड जिल्ह्यात मराठा बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केले जातायत . निष्पांप लोकांवर गुन्हे दाखल करून आम्हाला डवचू नका . सत्ता म्हणून अन्याय करू नका मराठा अन्याय सहन करणार नाही . याबाबत मुख्यमंत्री , गृहमंत्री यांना बोललोय . सत्तर वर्षात जेवढे पक्ष व नेते झाले त्यांची आपण कधी जात व धर्म बघीतला नाही . त्यांना मोठं केल . पण त्यांनी इमानदारी ठेवली नाही . आपल्या लेकराबाळांचं भविष्य ते विसरले . आपल्या मदतीला ते येतील वाटलं होतं. परंतु आरक्षण मागताच ते विरोधात गेले . आपल्या विरोधात हे नेते आवाज उठवायला लागले . आपल्या बरोबर आरक्षणाच्या मागणीसाठी येत नाहीत . दीडशे आत्महत्या झाल्या यांनी आरक्षण दिलं असतं तर असं झालं नसतं . जितकी जमिन व संपत्ती महत्वाची तितकंच आरक्षण ही महत्वाचं आहे . जीवन जगताना पाणी लागतं तसच आता आरक्षण ही लागतचं. 70 वर्षापुर्वी आरक्षण मिळालं असतं तर आज सर्वात जास्त मराठा समाज प्रगत राहिला असता . 70 वर्षांपासून समित्या आणि आयोग झाले. ते म्हणायचे दस्ताऐवज नाही, पुरावे नाहीत, नोंदी सापडत नाहीत .1805 ,1967 ते 2023 पर्यंतचे आता आपल्याला कुणबीचे पुरावे मिळालेत . 70 वर्ष बुडाखाली पुरावे घेवून बसलात, कोणाच्या तरी दबावाखाली मराठ्यांची पोरं मोठी होऊ द्यायची नाही म्हणून कागदपत्र नाहीत नोंदी नाहीत म्हणून सांगायचं . आम्हाला असलेले आरक्षण झाकून ठेवलं आपली पोरं बरबाद झाली . 70 वर्ष आपल आरक्षण खाललं . लाखान नोंदी मिळतायत मराठा ओबीसी मध्येच आहे 50 टक्के च्या आतच आपलं आरक्षण आहे. हे या नोंदीमुळे सिध्द झालयं. त्यामुळे विरोधकांची तोंडं आता बंद झाली आहेत आता मराठा 100 टक्के ओबीसी आरक्षणात येणार त्यात आता शंकाच नाहीं . कारण कायद्याला हेच मान्य आहे कि जर पुरावे असतील तर राज्याने समाजाला आरक्षण द्यावंच लागतं . आपल्याला आता गाफील राहीचं नाही . आता आपल्या लेकराला आयुष्याची भाकरी मिळवायचीय यात राजकारण येऊ देऊ नका. आधी आपल्या लेकराचं भविष्य मग राजकारण आता एक माणूस सुधारवण बंद करा घराघरांतलं लेकरू सुधरावा. नोकरी व शिक्षण यासाठी आरक्षण गरजेचं आहे. मराठा आरक्षण लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. हि परंडयाची सभा नाही तर हि आरक्षणाची वेदना आहे. आपल्या लेकरांना आता यापुढे खाईत लोटू नका. येणारा डिसेंबर दिवस मराठ्यांचा सुवर्ण दिवस उगवणार आहे. म्हणून मी आराम न करता पुन्हा कामाला लागलो आहे . रात्रंदिवस एक करून आपल्या भेटीगाठी घेतोय. पहिले 17 दिवस व नंतर 9 दिवस उपोषण केले . आता एकजूट रहा लेकरांचं नातवांचं भावांच बहिणींच चांगलं होईल रात्रंदिवस काबाड कष्ट करणारा आपला मराठा समाज त्यातून उभारलेला पैसा शिक्षणाला लावायचा पण या आरक्षणाविना आपली स्वप्न पुर्ण होत नाहीत. म्हणून आपल्याला जागच राहिचय. करोडो मराठ्यांच्या उसळलेल्या या प्रचंड त्सुनामीत सरकारला का सुधरत नाही आता न्याय घ्यायचाच आता माघार नाही. नोंदीचा आधार घेऊन अहवाल तयार करून या आधारावर व पुरावे यावर आरक्षण मिळतय. सरकारचं व आपलं तसं ठरलंय. आता आधार व पुरावे मिळालेत . 24 डिसेंबरला मराठा कुणबी एकच असल्याचा कायदा पारीत होणार व घराघरात आरक्षण मिळणार आहे. आपली एकजूट फुटू देऊ नका. हा विजय मराठ्यांचाच होणार आहे. मरण जरी आलं तरी चालेल पण मागे हटणार नाही . प्रत्येक गावात साखळी उपोषण, आक्षण जागृती करावी, कोणतंही वाईट काम व वेसन करू नका, आरक्षणावरच लक्ष केंद्रित करा कसा कायदा पारित करीत नाहीत तेच बघू.असेही जरांगे पाटील म्हणाले.


 
Top