सोलापूर (प्रतिनिधी)-  मध्ये रेल्वे, सोलापूर विभागाच्या, सोलापूर स्थानकावर अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट चे काम सुरु झाले.

सोलापूर रेल्वे स्थानकाचा प्रवेश, बाहेरजाण्याचा मार्ग अपुरा पडत  आहे. तो विस्तृत करण्यासाठी अमृत भारत स्टेशन स्कीममध्ये नवा मास्टर प्लॅन आखला आहे. त्या अंतर्गत काही जुन्या वास्तु पाडून नवीन ठिकाणी उभारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात सोलापूर  स्थानक परिसरातील  जवळपास 30 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली टेक्निकल ट्रेनिंग  इन्स्टिट्यूट (TTI) 72 मध्ये स्थापित होती. तिला खाली करून आज एक पोकल्यांड आणि जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आला. यासाठी मंडल रेल प्रबंधक नीरज कुमार दोहरे  आणि  गती शक्ती युनिटचे सीपीएम अविनाश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरु आहेत.  


 
Top