परंडा (प्रतिनिधी) - वाशी तालुक्यातील पारगाव येथे येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महादेव आप्पा आखाडे यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ दिवाळी निमित्त साखर वाटप युवानेते  समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामदास कोळगे, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, वाशी न.पं. उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, ॲड. गणेश खरसडे, महादेव वडेकर, महादेव लोकरे, राजगुरू कुकडे, विधानसभा विस्तारक शिवाजी गिड्डे, अशोक जाधव, गणेश बोराडे कार्यक्रमाचे आयोजक  महादेव आप्पा आखाडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गावातील असंख्य महिला भगिनी व गावकरी उपस्थित होते.


 
Top