धाराशिव (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वांगीण विकास मंडळ, लातूर यांच्या विद्यमाने धनगर समाजाचा 18 वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. अंबाजोगाई रोडवरील विष्णुदास मंगल कार्यालयात होणार आहे. यासाठी 5 डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करावी.

सदरील वधु-वर नोंदणी निशुल्क / मोफत असून या भव्य दिव्य वधू-वर परिचय मेळाव्यास सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळावे अध्यक्ष ॲड. मारुती मांडुरके, उपाध्यक्ष डॉ. सिद्राम सलगर, सचिव ॲड. मंचकराव डोणे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण धायगुडे, संभाजीराव सुळ, सुरेश अभंगे, रामकिशन मदने, इंजि. रामराव रोडे, मनोज राजे, संभाजी बैकरे, राम पाटील, सुजित वाघे, नवनाथ कवितके, संपत गंगथडे, रामचंद्र मदने, ॲड. सिद्धेश्वर धायगुडे, उद्धव दुधाळे, ॲड. जीवन करडे, ॲड. राजेश बनसोडे, सुभाष लवटे, दगडू हजारे आदींनी केले आहे.


 
Top