भूम (प्रतिनिधी)-भूम, परंडा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करावा. नियमानुसार दुधाचा भाव 34 रूपये लिटर प्रमाणे दुध उत्पादकांना मिळावे, 25 टक्के अग्रीम पिकविमा 11 महसूल मंडळांना मिळावेत आदी मागण्यांचे निवेदन माजी आमदार राहुल मोटे यांनी उपविभागीय अधिकारी भूम यांच्या मार्फत सरकारकडे केली आहे.

 पशुखांंद्य दरवाढ कमी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी हनुमंत पाटोळे, अण्णासाहेब पाटील, प्रवीण खटाळ, तात्यासाहेब गोरे, मधुकर मोटे, नानासाहेब वनवे, संतोष खंडागळे, सतीश सोन्ने आदी उपस्थित होते.


 
Top