तुळजापूर  (प्रतिनिधी)- तालुक्यात मंगळवारी सांयकाळी सर्वदूर तालुक्यात सर्वञ पाऊस झाला या झालेल्या पावसामुळे रबीचे मोठे नुकसान झाले. तुळजापूर शहरासह  परिसरात मंगळवार मोठा  पाऊस झाला.या पावसाने  पिके व शेतीचे मोठे नुकसान केले. तालुक्यात बहुतांश भागालाही अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून

काढले. त्यामुळे काही ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्याच्या काही भागात दोन दिवसांपासून अवकाळीपावसाने धुमाकूळ घातलाआहे. 

अवकाळीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसानष झाले आहे. मराठवाड्यात ही  अवकाळी पाऊस सुरू आठवडाभरापासून वातावरणात बदल झाला असून मंगळवारी

पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण त्यातच उष्मा निर्माण झाल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम झाला आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असून, वेगवेगळ्या आजारांनी डोके वर काढले आहे. तालुक्यात आठवडाभर ढगाळ वातावरण व उष्णता यामुळे हैराण झालेल्या परिसरात मंगळवारी सांयकाळी  अचानक झालेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. मात्र शेतीस उपयुक्त असणाऱ्या या पावसाने शेतकरी सुखावले आहेत. या पावसाचा ज्वारी कांदा द्राक्ष तूर या पिकांना फटका बसला हरभरा, ज्वारी आदी रब्बी पिकांच्या  फायदेशीर  ठरणारा आहे. तालुक्यातील काटगाव, खानापूर, खुटेवाडी, चव्हाणवाडी, मंगरुळ, तडवळा, काक्रंबा, धारुर अदि भागात हा मुसळधार पाऊस झाला.


 
Top