तुळजापूर (प्रतिनिधी)-  जवाहर नवोदय विद्यालयात बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न झाला. या याप्रसंगी श्री विठाई हॉस्पिटलचे डॉ. श्रीराम नरवडे (एमडी मेडिसिन) यांनी विद्यार्थ्यांना संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगाविषयी माहिती दिली. यामध्ये कावीळ, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मलेरिया, टायफाईड हे रोग कशामुळे होतात याची सविस्तर माहिती सांगितली. 

तसेच हे रोग होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या मध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना  स्वच्छता, व्यायाम व सकस आहार घेण्याचे आवाहन केले. या यासाठी सुषमा येलकर, किशोर चौधरी, इंदू हुडा, विलास राऊत यांनी विशेष पुढाकार घेतला होता. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.


 
Top