धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाची मागील 70 वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारकडे अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला समाविष्ट करा म्हणून मागणी आहे. यासंदर्भात धाराशिव जिल्ह्यात गावोगावी घोंगडी बैठका होत असून, दि. 30 नोव्हेंबरच्या जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवच्या मोर्चास येण्या संदर्भात आवाहन केले जात आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमधील परिशिष्ट दोन मध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर धनगड असा स्पष्ट उल्लेख आहे मात्र हिंदी मध्ये भाषांतर करताना ज्या प्रकारे गुरगावचे गुडगाव, चोप्राचे चोपडा, जाखरचे जाखड याच प्रकारे या जमातीचे धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख असल्याने आता पर्यंत सर्वच सरकारने धनगरांना आरक्षण देणे पासून वंचित ठेवले आहे. धनगर आणि धनगड हे एकच असल्याचे अनेक पुरावे  देऊन ही केंद्र व राज्य सरकार धनगर व धनगड असा शब्दभ्रंश करून आरक्षण देणे असून पळ काढत असल्याचे येथील धनगर समाजांचे म्हणणे आहे. 2014 च्या निवडणूक आधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगरांना आरक्षण देऊ  म्हणून शब्द दिला होता. या सह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही सोलापूर येथील सभेत धनगरांना आरक्षण देऊ असा उल्लेख केला होता. मात्र अद्याप मागील 9 वर्षात धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून केंद्र व राज्य सरकारने वंचित ठेवले आहे. त्याच अनुषंगाने सरकारला आठवण करून देणे साठी धाराशिव जिल्ह्यातील गावोगावी धनगर समाजाकडून घोंगडी बैठकीचे आयोजन करून 30 नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


 
Top