तुळजापूर (प्रतिनिधी) - शहरातील गोलाई चौकात रस्त्यावर मध्य भागी बुधवार 29रोजी दुपारी अचानक शिवशाही बस बंद पडल्याने या चौकातील ऐका बाजुच्या वाहतुक बंद झाली. अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी येवुन शिवशाही बस काहीसी मागे घेतल्याने काही अंशी वाहतुक कोंडी दूर झाली. सध्या बसेस मधुन मोठ्या संखेने प्रवासी विशेषता महिला प्रवास करीत असल्याने या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी की तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानक बाजुला असलेल्या गोलाई चौकाच्या मध्य भागी सोलापूरहुन आलेली सोलापूर -गेवराई बस क्रमांक 081003 अचानक बंद पडली. ती चालु करण्याचा प्रयत्न केला असता चालु न झाल्याने बंद शिवशाही बसमधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये बसवुन आगारात पाठवले शिवशाही बस ब-याच वेळ चौकात बंद अवस्थेत असल्याने चौकातील वाहतुक खोळंबली यावेळी बंद बसमुळे ऐका रस्त्यावरील वाहतुक बंद झाली अखेर काही तासा नंतर ती बस आगारात नेली.
तिर्थक्षेञ तुळजापूरात सातत्याने नादुरुस्त बस समस्येला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे सोमवारी जुन्या बसस्थानक समोरील चौकात चक्क बस मधील केबिन मध्ये आग लागली प्रसंगावधान राखुन एसटी कर्मचाऱ्याने केबीन मध्ये जावुन पाण्याने आग विजवली ही घटना ताजी असतानाच बुधवारी चक्क याच रस्त्यावर गोलाई चौकात शिवशाही बस बंद पडली. या दोन्ही घटनेने प्रवाशांन मध्ये चिंतेचे व भितीचे वातावरण पसरले आहे. तिर्थक्षेञ ठिकाणी जर अशा बसेस प्रवाशांचा सेवेत असतील तर ग्रामीण भागातील खेड्यांन मध्ये कशा बसेस प्रवाशांचा सेवेत असतील असा सवाल प्रवाशांन मधुन केला जात. या अशा घटनांचा पार्श्वभूमीवर चांगल्या बसेस प्रवाशांच्या सेवेत द्याव्यात अशी मागणी प्रवाशांन मधुन केली जात आहे.