धाराशिव (प्रतिनिधी)- सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे व मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनिषा राखुंडे व शिलावती देशमुख यांनी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. 

याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मराठा आरक्षण योध्दा श्री. जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारपासून (दि.24) अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषण सुरू केले आहे.शासनाने आजतागायत या उपोषणाची दखल घेतलेली नाही.त्यामुळे श्री. जरांगे यांना समर्थन देण्यासाठी व सकल मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण   सुरू केले आहे. बीड येथे मराठा आंदोलकांनी केलेल्या प्रकारामुळे सरकारने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करणार असल्याचे समजले असून  हे पुर्णपणे चुकीचे आह. सरकारने आंदोलकांना असे करण्यास प्रवृत्त केले आहे. सदावर्ते नावाच्या व्यक्तीने चारंवार मराठा समाजाला हिणवले आहे व यासाठी आम्ही आजपासून आमरण उपोषणास बसत आहोत. तसेच सरकारने महाराष्ट्री कुठल्याही मराठा आंदोलकावर कोणताच गुन्हा नोंद करुन नये. युवकांच्या आत्महत्येला हे तिगाडी सरकार जबाबदार आह. म्हणून त्यांच्यावरही खुनाचा गुन्हा नोंद करावा व मराठा समाजास ओबीसी प्रवर्गांतर्गत आरक्षण मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. निवेदनावर शिलावती देशमुख, मनिषा राखुंडे, निखील जगताप आदींची स्वाक्षरी आहे.


 
Top