भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातून श्री क्षेत्र शिवलिंग शिवकडा ते कपिलधार पायी दिंडी सालाबाद प्रमाणे यावर्षी ही आज श्री 108 राचलिंग शिवाचार्य परडकर महाराज उपस्थितीमध्ये आज शिवकडा येथून कपिलधारसाठी पायी दिंडी मार्गस्थ झाली.
नागनाथ स्वामी यांचे प्रेरणे रासलिंग शिवाचार्य महाराज परडकर यांच्या कृपेने मागील 70 वर्षांपासून शिवकडा ते कपिलधार पायी दिंडी महा पदयात्रा काढण्यात येते. आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी शिवखेडा येथून प्रस्थान करून दिनांक 25 नोव्हेंबर रोजी कपिलधार येथे पौर्णिमेच्या दिवशी दिंडी पोहोचते. यावेळी बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर, डॉ. त्रिंबक स्वामी, सचिन बरणाळे, बाळू महाराज स्वामी, अश्विन कुमार कांबळे, सोनटक्के आप्पा यावेळी हाडोग्री गावातील भक्तगण उपस्थित होते.