नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील व्यासनगर येथे माऊली महिला भजनी मंडळ, पारायण समिती व श्री विठ्ठल रुक्माई मंदिर व्यवस्थापक मंडळ नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.29 ऑक्टोबरपासुन सुरू असलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्यात सहाव्या दिवशी दि.3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वा. भव्य दीपोस्तवाचा कार्यक्रम पार पडला. या दीपोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते दीप  प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या.

नळदुर्ग येथील व्यासनगर येथे दि.29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात येत आहे. दि.3 नोव्हेंबर रोजी परायणाच्या सहाव्या दिवशी पारायण मंडपात सायंकाळी 7 वा. भव्य दीपोत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचा शुभारंभ पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र मुळे, शिवाजीराव वऱ्हाडे, ह.भ. प.राम गायकवाड महाराज, नवल जाधव, उत्तम बनजगोळे, अमर भाळे आदीजण उपस्थित होते. प्रारंभी सौ. मोहरीर यांनी “शुभम करीतो“ हे गीत गायले. यानंतर सर्व महिलांनी एकत्रीत आराधना केली.

पारायण मंडपात एकाचवेळी शेकडो दीप प्रज्वलित झाल्यानंतर येथील वातावरण प्रफुल्लित व प्रसन्न झाले होते.हा दीपोत्सव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेविका सुमन जाधव, श्रीमती कमलाबाई सुरवसे, विमलबाई माने, सौ. रेखा वऱ्हाडे,मिनाक्षी काळे, मंगल गायकवाड,शांताबाई सुरवसे, कौशल्या सरडे, शिवाजीराव वऱ्हाडे, ह.भ. प.राम गायकवाड महाराज,चंद्रकांत कदम,चोपदार शिवाजी भोसले यांच्यासह सर्वच महिलांनी परीश्रम घेतले.


 
Top