भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील वालवड येथील सेवानिवृत्त पोलीस सहायक उपनिरीक्षक रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांच्या घरी 22 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी दरोडा टाकून जबरदस्तीने मारहाण करून रोख वीस हजार रुपयासह साडेसात लाखाचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले होते. आठ दिवस उलटत आले तरी पोलिस पथकाच्या तीन टीमला अद्याप कोणत्याही प्रकारचे  धागेदोरे हाताशी आले नाही असेच दिसत आहे. 

माझी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिंदे यांना व त्यांच्या पत्नींना मारहाण करून सोन्याचे दागिने घेऊन चोरटे लंपास झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पाठवले असता रात्री अंधार असल्यामुळे गाडीचा नंबर व चोरटे स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे ब्लर होत आहे. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यासाठी अडचण होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आमच्या तीन टीम चोरांचा कसून तपास करत असून लवकरात लवकर चोरांचा तपास लावू इतर जिल्ह्यातील पोलिसांनाही माहिती पाठवून तपास वाढवला आहे अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक कुणाल सुर्यवंशी यांनी दिली.


 
Top