धाराशिव (प्रतिनिधी)-नुकतीच धाराशिव येथे चौथी धाराशिव हाफ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या मॅरेथॉन मध्ये एकलव्य विद्या संकुल मंगरूळ यम गर वाडी तालुका तुळजापूर येथील इयत्ता दहावी वर्गात शिकणाऱ्या प्रवीण जाधव याने पाच किलोमीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. प्रवीण सुवर्णपदाचा मानकरी झाला.
प्रवीण ला क्रीडा प्रशिक्षक माऊली भुतेकर,बालाजी क्षीरसागर ,यशवंत निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.प्रवीण च्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वैदू,उपाध्यक्ष डॉक्टर अभय शहापूरकर ,कार्यवाह विवेक अयाचित ,सतीश कोळगे,अशोक संकलेचा,अभय कुलकर्णी,नाना शिर्के,तेजाताई कुलकर्णी,मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर,विठ्ठल म्हेत्रे,सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.