भूम (प्रतिनिधी)-26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन जाणून-बुजून साजरा न करणाऱ्या भूम नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निलंबित करण्यात यावे. व शासकीय, निमशासकीय कार्यालये, पंचायत समिती नगर परिषद ग्रामपंचायत प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालये जबाबदार अधिकारी व प्राचार्य मुख्याध्यापक अशा दोषी अधिकारी व मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यावर संविधान दिनाचा अपमान केल्याचे कलमे लावून कार्यवाही करावी अन्यथा दिनांक 6 डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेने दिला आहे.

26 नोव्हेंबर 1949 रोजी विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला संविधान दिले. या दिवसाचे जगात अन्यण्य महत्त्व आहे. हा दिवस देशात संविधान दिन म्हणून सर्वत्र साजरा केला गेला आहे. राज्यात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय जिल्हा परिषदा पंचायत समिती, महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायती महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात यावे. संविधान दिन साजरा न करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.

अन्यथा दि. 06 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 12:00 वाजता आम्हाला आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागेल. आमच्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास त्याच सर्वस्वी शासन जबाबदार असेल असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठावाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड तालुका अध्यक्ष महेंद्र गायकवाड, बी सी एन केबलचे मालक प्रकाश सीतापे, लोमटे, सायरन गायकवाड, पंकज चौधरी, सुनील बनसोडे, विनोद वाघमारे आदी च्या सह्या आहेत.


 
Top