उमरगा (प्रतिनिधी)-उमरगा तालुक्यातील कवठा येथे मराठा समाजाला आरक्षण व मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी कवठा येथे समाजसेवक विनायकराव पाटील यांनी 25 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. शासनाने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर तीन नोव्हेंबर रोजी जीवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी कवठा गावातील ग्रामस्थांनी चूलबंद ठेवून प्रधानमंत्री, गृहमत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेत गावातील सर्व समाजातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लातूर-उमरगा मार्गावर मधोमध लाकडी सरण रचून अंत्यसंस्कार करण्यात आले.